जनता दरबार महाराजा मंगल कार्यालयात होणार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १०/१/२०२५ रोजी सकाळी १० वाजता फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय/निमशासकीय विभागाच्या कार्यालय प्रमुख यांची आढावा बैठक, नागरीक संवाद आणि समस्या निराकरण करणेबाबत जनता दरबाराचे नियोजन सांस्कृतीक भवनाच्या पाठीमागे, बीएसएनएल ऑफीस शेजारी, फलटण या ठिकाणी आयोजीत करणेत आलेली होती, मात्र सदर बैठकीच्या ठिकाणामध्ये बदल करून,महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे.
No comments