Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी

Maharashtra Public Service Commission Exam on 2nd February

    सातारा दि. 31 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र गट-ब (अरापत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सातारा, कराड व वाई तालुक्यात होणार आहे. या अनुषंगाने दि. 2 फेब्रुवारी  रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे आदेश लागू केले आहेत.
परीक्षा होणारे केंद्रे पुढीलप्रमाणे.  अभयसिंहराजे भोसले, इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शाहूनगर, शेंद्रे, सातारा,  आण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, सदरबझार  सातारा,  कन्या शाळा. १५५ अ/ब, भवानी पेठ, सातारा,  लालबहादूर शास्त्री कॉलेज, १७ मल्हारपेठ, सातारा,  महाराजा सयाजीराव विदयालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, सातारा,  न्यू इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातारा,  अनंत इंग्लिश स्कूल, मंगळवार पेठ, सातारा, यशोदा टेक्निकल कॅम्पस, फैकल्टी ऑफ इंजिनिअरिंग, राष्ट्रीय महामार्ग क्र.४ जवळ, वाढे फाटा, सातारा,  यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सदरबझार, कॅम्प, सातारा भाग अ,  यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सदरबझार, कॅम्प, सातारा भाग -ब,  अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पानमळेवाडी, पो.वर्ये, ता.जि. सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेकनिक, पानमळेवाडी, पो. वर्ये, ता.जि.सातारा,  धनंजराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज, सदरबझार, कॅम्प सातारा, श्री. भवानी विद्यामंदिर, १७ मल्हार पेठ, सातारा,  कला व वाणिज्य महाविद्याल, ११७. अ/१.२.३ शुक्रवार पेठ, कोटेश्वर मैदानासमोर सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील, कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सदरबझार, आरटीओ ऑफिस शेजारी सातारा, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, सदरबझार सातारा,  शासकीय तंत्रनिकेतन, विद्यानगर कराड, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, विदयानगर, कराड भाग-अ., सदगुरु गाडगे महाराज कॉलेज, विदयानगर, कराड भाग-ब.,  सेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, ४८३, मंगळवार पेठ, कराड,  एस. एम. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, प्लॉ.नं. २२२, मंगळवार पेठ, कराड,  टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्लॉट नं. २२२, मंगळवार पेठ, कराड, यशवंत हायस्कूल, कराड, विठामाता विद्यालय अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, ३०३, बुधवार पेठ कराड, श्री. शिवाजी विद्यालय, ३१३, बुधवार पेठ, कराड , यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर, कराड , कन्या शाळा, महर्षी कर्वे रोड, ४१०, मधली आळी, वाई , द्रविड हायस्कूल, सोनगिरवाडी, वाई, भाग-अ, द्रविड हायस्कूल, सोनगिरवाडी, वाई भाग-ब, किसन वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, -अ, किसन वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, वाई, भाग-ब, महर्षी शिंदे विद्यामंदिर, ज्यु कॉलेज, रविवार पेठ, वाई, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, ब्राम्हणशाही, वाई, छत्रपती शिवाजी कॉलेज, सदरबझार, कॅम्प, सातारा.

    या परीक्षा केंद्रांवर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी.बुथ, आयएसडी बुथ, फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅझीस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेहण्यास मनाई करण्यात आली आहे.

No comments