Breaking News

ना.जयकुमार गोरे व रणजितसिंह यांच्या उपस्थितीत राजे गटातील अनेक दिग्गजांचा होणार प्रवेश - अशोकराव जाधव

Many people from the Raje group will be join to the MP group

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - पालकमंत्री निवडीमुळे राजे गटाची गळती थांबवण्याची आशा मावळली आहे. विधानसभा निवडणुकी नंतर राजे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी, कार्यकर्त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होतील व आपली सातारा प्रशासनावर पकड राहील, ही खोटी आशा, राजे गटाकडून दाखवण्यात आली, मात्र ही आशा काल मावळली, त्यामुळे फलटण तालुक्याचा विकास करण्यासाठी फक्त माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. रणजितसिंह यांच्या विकासाभिमुख नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यातील व शहरातील अनेक राजकीय दिग्गज प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा प्रवेश लवकरच सोलापूरचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे व मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत गजनान चौक , फलटण येथे घेण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी सांगितले.

No comments