हरवलेली 4 वर्षीय मुलगी पालकांना परत ; फलटण पोलिसांची कामगिरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - फलटण एसटी स्टँड येथे स्वारगेट - सांगोला या एसटी बस मधून उतरलेल्या ४ वर्षीय मुलीला तिचे नाव, घरचा पत्ता सांगता येत नसतानाही फलटण शहर पोलीस स्टेशनच्या ट्राफिक वॉर्डन यांनी सीसीटीव्ही फुटेज व फलटण एसटी आगार यांच्या मदतीने मुलीच्या पालकांचा पत्ता शोधून सदरची हरवलेली चार वर्षीय मुलगी परत दिली.
या बाबत अधिक माहिती अशी, फलटण एसटी स्टँडवर दिनांक १९ जानेवारी २०२५ चे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगी एसटी स्टँडवर रडताना मिळून आली. तिच्याकडे चौकशी केला असता तिला तिच्या घरचा नाव, पत्ता सांगता येत नव्हता. सदर मुली बाबत सीसीटीव्ही फुटेज पाहून, शोध घेतला असता, सदरची मुलगी स्वारगेट - सांगोला या बसमधून उतरल्याचे दिसून आले. या माहितीवरून बस डेपो मॅनेजरच्या मार्फत सांगली बसच्या ड्रायव्हरशी संपर्क साधून, एस.टी मधील मुलीच्या पालकांचा शोध घेतला असता, ती मुलगी प्रकाश गायकवाड राहणार तुंगत, पंढरपूर यांची असल्याचे समजले. मुलीचे नाव कुमारी राजनंदिनी वय ४ वर्षे, त्यानंतर पालकांना संपर्क साधून, त्यांना नातेपुते येथून परत बोलावले, तोपर्यंत मुलीला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. रात्री उशिरा पालक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात मुलीला देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही फलटण शहर पोलीस स्टेशनचे ट्राफिक वॉर्डन आकाश गोळे व ऋतुजा कुदळे यांनी केली.
No comments