आमदार सचिन पाटील यांनी घेतला फलटण तालुक्यातील पाणीपुरवठा विभागाचा आढावा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - आज फलटण येथील रेस्ट हाऊस, येथे आमदार सचिन पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाची, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, दारासिंग निकाळजे विस्तारित गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, गटनेते अशोकराव जाधव, अमित रणवरे, अमोल खराडे उपस्थित होते.
यावेळी फलटण तालुक्यामध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यातील पाणी टंचाई कुठे कमी पडु नये. तालुक्यामध्ये एकही गावाला पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी हे कमी पडले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी असे आदेश आमदारांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणंद रस्ते, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती आमदारांनी घेतली.
तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच,व जिल्हा परिषद शिक्षक याची लवकरच बैठक घेऊन, गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आ.सचिन पाटील प्रयत्न करणार आहेत. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांनी सर्व माहिती दिली. या तालुक्यातील जनतेची कामे करण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल असे अश्वासन दिले.
No comments