मुधोजी महाविद्यालयाची महिला क्रिकेटपटू ऋतिका चतुरे हिची शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघामध्ये निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ क्रिकेट (महिला) स्पर्धा मोहनलाल सुखदेव विद्यापीठ उदयपूर राजस्थान येथे दणदणीत विजय मिळवून शिवाजी विद्यापीठाचा क्रिकेट (महिला) संघ, अखिल भारतीय क्रिकेट (महिला) स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर मुधोजी महाविद्यालयाची महिला क्रिकेटपटू कु.ऋतिका चतुरे हिची शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
No comments