अघोरी घटनेतून विडणी येथे महिलेची हत्या? मृतदेहाजवळ काळीबहुली,कुंकू,नारळ सापडले
महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह (छाया - योगेश निकाळजे) |
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ -विडणी ता. फलटण येथे ऊसाच्या शेतामध्ये एका महिलेचा निर्घुण खून करण्यात आला असून, याठिकाणी नारळ, कुंकू, कळू बाहुली आशा वस्तू आढळून आल्याने, काहीतरी आघोरी घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, अंधश्रद्धेतून महिलेचा बळी गेला असल्याची चर्चा सुरू असून, या घटनेने विडणीसह संपूर्ण फलटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, दि.17 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावातील डॉ. प्रदीप जाधव हे आपल्या 25 फाटानजीक व शिवाजी महाराज मठाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या आपल्या ऊसाच्या शेतात गेले असता त्यांना, शेतामध्ये सडलेला वास आल्याने, त्यांनी पाहणी केली, त्यांना ऊसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळला, त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसपाटील सौ.शीतल नेरकर यांना दिली.
या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी ,परकर, पांढरा रंगाचा स्कार्प, चप्पल तसेच लिंबू नारळ, काळी बाहूली हळदीकुंकू ,गुलाल, दहीभात तसेच याठिकाणी आघोरी विधी केल्याचे सामान दिसून आले आहे, तसेच याच ठिकाणीच धारदार चाकू, सुरा यासारखे घातक हत्यारेही आढळून आली तसेच या महिलेचे मुंडन केलेले केस, रक्त व तेलाचे डागही दिसून आले आहेत यावरून या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवठी आढळून आली आहे, तर थोड्याच अंतरावर याच महिलेचा शरीराच्या कमरेखालचा संपूर्ण भाग हिस्त्र प्राण्यांनी खाल्लेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आला, या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती, यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच फलटणचे पोलिस उपअधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहूल धस,पोलिसनिरीक्षक सुनील महाडिक उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील शिवाजी जायपत्रे ,नागटिळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन, अधिक माहिती घेतली दरम्यान पोलिसनपथकाने संपूर्ण परिसरातील शेतामध्ये पाहणी केली असून, याबाबतचा अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत.
No comments