प्रतीक्षा सागर अहिवळे हिचे ग्रामसेवक परीक्षेत यश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - मंगळवार पेठ,फलटण येथील सागर कुशाबा अहिवळे यांची मुलगी प्रतीक्षा सागर अहिवळे हिने स्पर्धा परीक्षेतची ग्राम पंचायत अधिकारी परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे., तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
प्रतीक्षा सागर अहिवळे हिचे प्राथमिक शिक्षण प्रबुद्ध विद्या भवन येथे तर माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल येथे झाले. श्रीमंत मालोजीराजे शेती महाविद्यालयातून बी.एस.सी. हॉर्टिकल्चर ची पदवी संपादन करून पुढे एम.बी.ए. पदवी संपादन केल्यानंतर, तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून ग्रामसेवक पदाच्या परीक्षेत यश संपादन केले.
No comments