Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण तालुकाध्यक्षपदी शिवरूपराजे खर्डेकर

Shivruparaj Khardekar as Phaltan Taluka President of Nationalist Congress Party

    आसू (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) फलटण तालुका अध्यक्षपदी जिल्हा बँकचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा कार्यालयात खासदार नितीन पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर,आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजित केले होते.त्यात शिवरूपराजे खर्डेकर यांची फलटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.यावेळी खासदार नितीन पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या हस्ते शिवरूपराजे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार शिवरूपराजे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे.खा.नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.

    वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दिलेली ही जबाबदारी मी प्रामाणिक पणे पाडीन.तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.याकामी महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेणार आहे असे शिवरूपराजे यांनी सांगितले.

    शिवरूपराजे यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    नुकताच शिवरूपराजे खर्डेकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी फलटण तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आणि आमदार सचिन पाटील यांचेकडे शिवरूपराजे खर्डेकर यांना फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) अध्यक्ष करावे अशी मागणी केली होती.त्यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासन दिले होते.त्याला आज मूर्त स्वरूप आल्याने आसूमध्ये आनंदाचे वातावरण आहे.कार्यकर्त्यांनी गावात फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

No comments