राजे गटाला धक्का देत माजी नगराध्यक्ष कै. नंदकुमार भोईटे यांचे पुतणे अमित भोईटे यांचा भाजपामध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - माजी नगराध्यक्ष दिवंगत नंदकुमार भोईटे यांचे पुतणे व उद्योजक अमित भोईटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राजे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
फलटणचे माजी नगराध्यक्ष कै. नंदकुमार भोईटे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून, त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे अमित भोईटे हे, त्यांचा गट सांभाळत होते. त्यांनी राजे गटाला धक्का देत, आज माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव,सचिन अहिवळे उपस्थित होते.
No comments