Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to NCP Janata Durbar

    सातारा दि १३ (प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या वतीने जनता दरबार माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात आयोजित जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला. यावेळी 45 तक्रारीचा "ऑन दि स्पॉट" निपटारा करण्यात आला.

    जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी मार्गी लागत असल्याने या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून सातारा पक्ष कार्यालयात आमदार शशिकांत शिंदे जनता दरबार आयोजित करीत आहेत. या दरबारात जनतेला आपल्या समस्या, प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. जनतेचा हक्काचा जनता दरबार म्हणून त्यांची ओळख आहे. सोमवारी सातारा येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झालेल्या जनता दरबारात जिल्ह्यातील अनेक शेतकरी,कामगार, व्यावसायिक, महिला, तरुण व अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. प्रत्येकाच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रमाणिक प्रयत्न यावेळी त्यांनी केला.पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक लोकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर आ. शिंदे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून तक्रारींचा निपटारा केला. महसूल, आरोग्य विभाग, जलसिंचन, पशुसंवर्धन, महावितरण, जिल्हा परिषदेचे विविध विभाग,धरणग्रस्त, कृषी,एस.टी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, फायनान्स कंपनी, गिरणी कामगार अशा अनेक विभागातील तक्रारींचा यावेळी निपटारा करण्यात आला.

    या जनता दरबारावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, संदीप मोझर, अतुल शिंदे, शफीक शेख विजय बोबडे, डॉ.नितीन सावंत, भारती काळंगे,अर्चना देशमुख, अमोल पाटोळे,सचिन जाधव, बाळासाहेब शिंदे, विजय कुंभार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments