श्रीमंत सत्यजितराजे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण, जि. सातारा येथे भव्य राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय जलदगती एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी कोहीनूर चेस अॅकॅडमी, फलटण, श्री. माने बुद्धीबळ प्रशिक्षण वर्ग व डॉ. जयंत गावडे सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या स्पर्धा खुला गट, १४ वर्षाखालील गट, १० वर्षाखालील गट, १२ वर्षाखालील या गटांमध्ये खेळवण्यात येणार असून, स्पर्धेतून बेस्ट फलटणकर,उत्कृष्ठ कन्या (१४ वर्षाखालील वयोगट) सर्वोत्तम अनुभवी (६० वर्षावरील), सर्वोत्कृष्ठ दिव्यांग, उत्कृष्ठ अॅकॅडमी अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण रोख बक्षिसे रु.३२०००/- रुपयांची असणार आहेत.
राज्यस्तरीय जलद गती एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेचे चिफ ऑर्बिटर म्हणून शार्दुल तपासे (आय.ए.) हे काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वासाठी प्रवेश फी रु.२००/- आहे.स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी श्री. प्रमोद माने मो. ८००७५४४६११, सुजीत जाधव, कोहिनूर चेस अॅकॅडमी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धेचे आयोजक श्री. सौरभ तेली मो. ८८८८६४४३५२ व श्री. आशिष शिंदे (भैय्या) मो. ९७३०००४८२७ यांनी केले आहे.
No comments