Breaking News

स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडचा ३१०१ रु. पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा

Swaraj Green Power and Fuel Limited's first installment of Rs. 3101 deposited in the accounts of sugarcane growers

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - गळीत हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज कारखाना ने  गळितास आलेल्या ऊस बिलाची प्रती टन रु. ३१०१/- प्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे.

   या हंगामात व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनामुळे गाळप क्षमतेइतका ऊस पुरवठा करण्याइतकी पुरेशी यंत्रणा उपलब्ध झाली आहे.

      व्यवस्थापनाने या गळीत हंगामासाठी आठ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.  शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळितास पाठवून सहकार्य करावे, या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याची काळजी प्रशासन ने घेतली आहे. यापुढे ही तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य ते सुविधा देण्याचा प्रयत्न माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात केला जाईल.

No comments