मुकुंद मोरे लिखित 'तुझ्या शहरातली ही पहाट' या काव्यासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत मुधोजी महाविद्यालय फलटण, पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ सकाळी १० वाजता, ऑडिटोरियम हॉल, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे कवी मुकुंद मोरे लिखित 'तुझ्या शहरातली ही पहाट' या काव्यासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार असून कारण माझ्या प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख हे असणार आहेत. कार्यक्रमास चांडाळ चौकडीच्या करामती फेम अभिनेता रामदास जगताप व डॉ. कुंडलिक केदारी (निर्माते-दिग्दर्शक- वा पैलवान, आत्मबोध चित्रपट) यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम व मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर पवार यांनी दिली.
No comments