नारळीबाग, फलटण येथून तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - नारळीबाग, फलटण येथे एल.आय.सी ऑफिसच्या समोर पार्क केलेल्या होंडा दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या पर्स ३ लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, बँक लॉकर चावी, एफडी पावती अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,दयानंद बाजीराव शिंदे, वय 53 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. मु. कोऱ्हाळे पो. बिबी ता. फलटण यांनी दि.24/01/2025 रोजी दुपारी 2.15 वाजता ते दुपारी 3.00 वाजण्याच्या दरम्यान, त्यांची होंडा कंपनीची मोटरसायकल क्र. एम एच 11 सी वाय 5907 नारळीबाग, फलटण, येथे एल.आय.सी ऑफिसच्या समोर पार्क केली होती. त्या मोटार सायकलच्या डिग्गीतील पर्समध्ये ठेवलेले 2,48,700/-रूपये किंमतीचे एक सोन्याची पट्टी व त्यामध्ये सोन्याचे पदक असलेले गंठण, 55,000/-रूपये रोख रक्कम, 1000/- रूपये किंमतीची चांदीची जोडवी, 3,04,700/- एकुण रुपये किंमतीचा ऐवज तसेच, पत्नी सौ. सिमा दयानंद शिंदे हिचे नावे असलेली एक लाख रूपयाची विजय ग्रामीण पतसंस्था बिबी शाखेची एफ.डी.पावती, बँकेमधील लॉकरची चावी असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.
No comments