एआयआर गुरुजी इंटरनॅशनल लॅबद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान क्रांतीची बीजे रोवली : डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - सातारा जिल्ह्यात सर्व प्रथम, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सर्व शाखांमध्ये एआयआर गुरुजी इंटरनॅशनल लॅबची (AIR Guruji International Lab) सुरुवात केली असून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान क्रांतीची बीजे रोवली आहेत. भारतातील कृत्रिम तंत्रज्ञानाच्या AI वाढत्या प्रभावाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढविणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीतम घडामोडींची त्यांना माहिती करुन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण आणि एआयआर गुरुजी इंटरनॅशनल लॅब यांच्या संयुक्त सहभागाने श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या प्रांगणात भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५ चे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी बेडके, सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी एआयआर AIR भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन व ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान विभागातील एमएचटी - सीईटीच्या (MHT - CET) विद्यार्थ्यांच्या सखोल तयारीसाठी स्मार्ट टीव्ही (Smart T. V.) चे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, सी. एल. पवार, सोसायटी नियामक मंडळ सदस्य सतीश पटवर्धन, महेंद्र सूर्यवंशी बेडके, सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी बेडके, शिवाजीराव बेडके, प्रकाश तारळकर, गुरुजी इंटरनॅशनल इंडिया सीईओ प्रताप पवार, एअर गुरुजी महाराष्ट्र प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खवळे, विशाल अवताडे, प्रशालेचे प्राचार्य एस. बी. थोरात, प्राचार्या सौ. व्ही. के.सुरवसे, प्राचार्या सौ. गायकवाड, प्राचार्या सौ. काकडे, मुख्याध्यापिका सौ. बेडके, प्राचार्य काटकर, प्राचार्य उदय जाधव, उपप्राचार्य पी. डी. घनवट, पर्यवेक्षक के. एच. खरात विज्ञान विभाग प्रमुख पी. व्ही. साळुंखे यांच्यासह विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होते.
डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी एआयआर गुरुजी भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ही (आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण) आता काळाची गरज बनणार आहे. या प्रदर्शनातून आपले उपकरण सादरी करणाची संधी मिळेल, त्यामध्ये मिळालेल्या बक्षीसांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात प्रगती होईल तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या इतर शाखेतील विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसची संधी उपलब्ध करुन दिली जाईल विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करुन स्वतःच्या वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना द्यावी असे आवाहन डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी यावेळी केले.
एअर गुरुजी महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खवळे यांनी प्रथमत: श्रीराम एज्युकेशन सोसायटीने एअर गुरुजी लॅब सुरु करण्यास परवानगी दिल्याबद्दल संस्था व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले, या संस्थेत लॅबच्या माध्यमातून २०० मुले सध्या शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आणून देत एआयआर (AIR) गुरुजी संस्था काय काम करते याविषयीची माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांनी प्रदर्शन डोळसपणे पहावे व नवीन तंत्रज्ञान समजावून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. बी. थोरात यांनी प्रास्तविकात भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५ भरविण्यामागचा हेतू व उद्देश स्पष्ट केला.
या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये श्रीराम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापली उपकरणे सादर केली व त्याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखविले.
दुपारच्या सत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन २०२५ चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला, श्रीराम एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके, प्रकाश तारळकर, गुरुजी इंटरनॅशनल इंडियाचे सीईओ प्रताप पवार, प्रशालेचे प्राचार्य एस. बी. थोरात, प्राचार्या सुरवसे, प्राचार्या काकडे, प्राचार्या गायकवाड, मुख्याध्यापिका बेडके, उपप्राचार्य पी. डी. घनवट, पर्यवेक्षक के. एच. खरात, विज्ञान विभाग प्रमुख पी. व्ही. साळुंखे यांच्या हस्ते विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार केले, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर भव्य विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास १०० हून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इयत्ता ४ थी ते ७ वी लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्रा. शाळा काळज व लोणंद, सौ. वेणूताई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील विद्यार्थिनींनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता ८ वी ते १० वी मोठ्या गटांमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव द्वितीय क्रमांक, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणने तृतीय क्रमांक मिळविला.
विशेष गौरव पुरस्कार २४ उपकरणांना देण्यात आले.
या प्रदर्शनात सर्व शाखा मधील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी या विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एम. तगारे व सौ. सुजाता पवार यांनी आणि समारोप व आभार प्रदर्शन एस. डी. यादव यांनी केले.
No comments