Breaking News

व्यसनमुक्ती चळवळ गतिमान करण्यासाठी पिंप्रद येथे दि. ९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय संवाद मेळावा

To speed up the de-addiction movement at Pimprad. A state level dialogue should be held on February 9

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - व्यसनमुक्ती, दारुमुक्तीसाठी महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणार्‍या संस्था, व्यसनमुक्ती केंद्र, कार्यकर्ते, सामाजिक, आध्यात्मिक कार्याद्वारे प्रबोधन, औषधे इ. उपाय योजना करुन नशा मुक्तीसाठी कार्यरत असणार्‍या सर्वांसाठी रविवार दि. ९ फेब्रुवारी  रोजी सकाळी ठिक ९ वाजता 'जीवन ज्योत' या महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाच्या मध्यवर्ती कार्यालय, पिंप्रद, ता. फलटण जि. सातारा येथे (राष्ट्रबंधु राजीवजी दीक्षित गुरुकुल) सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    या मेळाव्याद्वारे सर्वांना एकत्र आणण्यासाठी, सर्वांचा एकत्र संवाद व्हावा या दृष्टीने व व्यसनमुक्तीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी चला एकत्र येऊ, व्यसनमुक्त राष्ट्र घडवू.

    या संकल्पनेतून एक दिवसीय संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  तरी व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणार्‍या सर्व संस्था, व्यसनमुक्ती केंद्र, कार्यकर्ते यांनी आपली नावे त्वरीत नोंद करावीत असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्यावतीने करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नाव नोंदणी साठी संपर्क - मोबईल ९६८९६३९५५९.
 

No comments