Breaking News

फलटण शहरातील दोघांना दोन वर्षे तडीपार

Two years imprisonment for two years in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण शहरातील दोन जणांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयामध्ये फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) अभिजीत अरुण जाधव, वय २१ वर्षे, टोळी सदस्य २) आकाश भाऊसाो सावंत, वय २३ वर्षे, रा. दोन्ही रा. मलटण ता. फलटण, जि. सातारा यांचे टोळीवर, फलटण शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे असे गुन्हे दाखल असल्याने, फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार शहा फलटण शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री. राहुल आर. धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती.

    सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही, त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे, फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

    मा.समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळी प्रमुख १) अभिजीत अरुण जाधव, वय २१ वर्षे, टोळी सदस्य २) आकाश भाऊसो सावंत, वय २३ वर्षे, रा. दोन्ही रा. मलटण ता. फलटण, जि. सातारा यांची सुनावणी होवुन, त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

    नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३५ उपद्रवी टोळयांमधील ११२ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०४ इसमांना असे एकुण १५४ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन, सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

    या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो.हवा बापू धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

No comments