श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
आसू,ता.24 :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,पंचायत समितीचे माजी सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर ऊर्फ बाळराजे खर्डेकर यांचा वाढदिवस उद्या (शनिवारी) साधेपणाने साजरा होत आहे.ते सकाळी येथील कुलदैवत भवानीमातेचे दर्शन घेतील.त्यानंतर नंतर (कै.) दादाराजे खर्डेकर यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतील.ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिरात अभिषेक व दर्शन घेतील. सकाळी नऊ वाजता श्री काळेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ आणि वह्यांचे वाटप,तसेच शाळेस पाण्याची टाकी प्रदान कार्यक्रम होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन होईल. कुस्ती मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते बारा यावेळेत त्यांच्या निवासस्थानी ते मान्यवरांचे शुभेच्छा स्वीकारतील.
No comments