Breaking News

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक

Vehicles must be fitted with high security registration number plates before March 31, 2025

        सातारा दि.13: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना  हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे  प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

    हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद असलेल्या वाहनांकरिता Zone No.2 मध्ये M/s Real Mazon India Ltd. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांच्या सोयीकरिता सदर कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.

    वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या https:/transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील. तसेच वाहनधारकांना आपल्या नजीकच्या कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटरवर अपॉईमेंट घेऊन सदरची सुविधा घेता येईल. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता वाहन प्रकार निहाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट शुल्क जीएसटीसह - टु व्हिर्लस व ट्रॅक्टर्ससाठी - रु. 531/-, थ्री व्हिर्लससाठी - रु. 590/-, लाईट मोटार व्हेईक्ल्स/पॅसेंजर कार/मेडियम कर्मशिअल व्हेईक्ल्स/हेवी कर्मशिअल व्हेईक्ल्स आणि ट्रेलर/कॉम्बिनेशनसाठी  - रु. 879.10/-

    वरीलप्रमाणे शुल्क आकारण्यात यईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.

    सातारा आणि फलटण कार्यालयातील जुन्या नोंदणीकृत वाहनांना  हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कंपनी फिटमेंट सेंटर पुढीलप्रमाणे. कोरेगाव - सातारा पंढरपूर रोड, वसुधा पेट्रोलपंपाशेजारी. सातारा-हेम कंपनी, फ्लुरा हॉटेलजवळ, वडूज- वरद ॲटोमोबाईलजवळ कराड रोड, खंडाळा- शिवाजी चौक मार्केट यार्ड गाळा खंडाळा लोणंद रोड, वाई - वाई बावधन रोड अर्थव आदित्य फटाका जवळ, फलटण- शिंगणापूर रोड समर्थ ऑफसेट अजित नगर कोळकी, दहिवडी- मायणी रोड बीएसएनल ऑफीसच्या समोर, महाबळेश्वर- नॅशनल गॅरेज टॅक्सी स्टँड दत्त मंदिर जवळ (संपर्क क्र. 8275370068)

No comments