कत्तलीसाठी चालवलेली २ गोवंशी जनावरे पकडली ; ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - फलटण सातारा रोडवर, वाठार फाटा येथे सुपर कॅरी या चार चाकी वाहनात दोन जर्शी गाई कत्तल करण्याच्या उद्देशाने, चारापाण्याची सोय न करता विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.21/02/2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजण्याच्या सुमारास फलटण ते सातारा रोडवर वाठारफाटा येथे, अमोल भिवा जाधव, महादेव हणमंत गुजले दोन्ही रा. विडणी ता. फलटण जि. सातारा हे दोघे, एक पांढऱ्या रंगाच्या सुपर कॅरी वाहन क्रमांक एम एच ११ डीडी २१५६ गाडीत २० हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची जर्शी गाय व दुसरी १५ हजार रुपये किंमतीची काळ्या व पांढऱ्या रंगाचे जर्सी गाय दोरीने बांधून, त्यांना अन्न पाणी व चारा यांची सोय न करता, त्यांची वैद्यकीय तपासणी न करता, कत्तलीसाठी घेऊन जात असताना मिळून आले. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद करत, दोन्ही गाईंसह चारचाकी वाहन असे एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
No comments