Breaking News

कोळकी येथील लग्न सोहळ्यातून १ लाख २३ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लंपास

A gold chain worth Rs 1 lakh 23 thousand was stolen from a wedding ceremony in Kolki

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - कोळकी, ता.फलटण येथील लग्न सोहळ्यातील वर पक्ष रूम मध्ये कपड्याच्या बॅगमध्ये ठेवलेली सोन्याची चैन व पर्स असा एकूण 1,23,000 रुपये किमतीचा ऐवज चोरल्याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून म्हणाले माहितीनुसार, दि. 07/02/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान, सिध्दीविनायक मंगल कार्यालय कोळकी, ता.फलटण येथुन वर पक्ष रूम येथे कपड्याच्या बॅगमध्ये ठेवलेली   सोन्याची चैन व पर्स असे एकुण 1,23,000/- रूपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची फिर्याद समीर भानुदास नाळे रा.दुधेबावी, ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ या करीत आहेत.

No comments