स्वारगेट बस अत्याचारातील आरोपी दत्तात्रय गाडेला पकडून देणारास 1 लाख रुपये इनाम जाहीर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - पुणे स्वारगेट बस स्थानकात फलटणला निघाकेल्या २६ वर्षीय तरुणीवर नराधम दत्तात्रय रामदास गाडे याने बलात्कार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पुण्यासह महाराष्ट्र हादरला असून, राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. पुणे पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान केली असून, तपासासाठी १३ पथके ही रवाना करण्यात आले आहेत मात्र आरोपी दत्तात्रय गाडे हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे यास पकडून देणाऱ्याला १ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.
दत्ता गाडे सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी १३ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तसेच तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्वारगेट पो. स्टे. गु. रजि. नं. ५९/२०२५ भा. न्या. सं. २०२३ चे कलम ६४, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा आरोपी नामे दत्तात्रय रामदास गाडे, वय ३७ वर्षे, रा. गुनाट ता. शिरूर, जि. पुणे याने केला असून तो दाखल गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे. आरोपी नामे दत्तात्रय गाडे याचे विषयी माहिती देणा-यास रू. १,००,०००/- (एक लाख रुपये) बक्षीस देण्यात येईल. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे सांगून पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क क्रमांक : स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे ०२०-२४४४२७६९, श्री. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पो. स्टे.,मो. क्र. ९८८१६७०६५९, श्रीमती पुनम पाटील, महिला पोलिस उप-निरीक्षक, मो. क्र. ८६००४४४५६९
No comments