Breaking News

गावठी कट्टा बाळगणारा रेकॉडवरील आरोपी जेरबंद

Accused on record of carrying gavathi katta jailed

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ - विडणी ता. फलटण गावचे हद्दीत गावठी बनावटीचे फायर आर्म बाळगुन, त्याची विक्री करण्याचा प्रयत्न असणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीस फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून ते अग्निशास्त्र जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मा. पोलीस अधीक्षक सोो. यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी यांना आपले हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध अग्नी शास्त्राचा वापर होऊ नये म्हणून अशी अग्णीशस्त्र बाळगणारे लोकांची गोपनीय माहिती काढून या प्रकारचे संभाव्य गुन्हे करणारे रेकॉडवरील आरोपी तपासण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत.

    मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये फलटण ग्रामीण पोलीस ठाणे याबाबत सतत माहीती काढत असते दि १२/०२/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना गोपनिय माहीती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कल्लु बेनकर रा. बावीस फाटा गणेशशेरी, धुळदेव, ता. फलटण हा मौजे विडणी ता. फलटण गावचे हद्दीत फलटण ते पंढरपूर रोडवर बस स्टॉपजवळ उभा आहे. आणि त्याचेकडे गावठी बनावटीचे फायर आर्म बाळगुन वावरत आहे व तो विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहीती मिळाल्यानंतर त्यावेळी लागलीच मा. पोलीस निरीक्षक महाडीक साो यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मा जी बी बदने, पो हवा नितीन चतुरे, पो हवा वैभव सुर्यवंशी. पो ना अमोल जगदाळे, पो ना श्रीनाथ कदम, पो कॉ हणुमंत दडस, पो कॉ शिवराज जाधव यानां सदर ठिकाणी जावुन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथक रवाना झाले. सदर ठिकाणी गेल्यावर एक इसम संशयीतरीत्या वावरताना आढळून आला. त्याला पोलीसाची चाहुल लागल्याने तो पळुन जाण्याच्या पर्यत्नात असताना पो ना श्रीनाथ कदमे यांनी झडप मारुन पकडुन ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचा कट्टा व त्याच्या खिशातील एक जिवंत काडतुस व एक रिकामी पुंगळी मिळुन आली. सदर अग्नी शस्त्रामधुन एक एक गोळी फायर करण्याची बनावट दिसुन आली. सदर इसमाला याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे भंगार काम करणारा परप्रांतीय कामगाराकडुन घेतलेली आहे असे त्याने सांगितले. सदर अग्नीशस्त्र पोलीसांनी जप्त करुन त्याचे विरुध्द फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र. नंबर १३३/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५,२७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचा गुन्हा अभिलेख तपासला असता त्याचे विरुध्द खालील प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

    १ फलटण शहर पोलीस ठाणे गु र नं २४६/२०१८ भा व वि सं कलम ३८०,४५७, २ फलटण शहर पोलीस ठाणे गु र नं २१३/२०१९ भा द वि सं कलम ३९९, आर्म अॅक्ट ४,२५, ३ फलटण शहर पोलीस ठाणे गु रं नं ९४/२०१८ भा द वि सं कलम ४५७,३८०, ४ फलटण शहर पोलीस ठाणे गु र नं २२२/२०२० भा द वि सं कलम ४५७,३८० सदर आरोपींकडे अधिक चौकशी करीत आहोत.

    सदरची कामगीरी मा. समीर शेख सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा. राहुल घस सो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.

No comments