शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी जेरबंद ; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - फलटण तालुक्यात आलीकडील काळात डीपी चोरीचे गुन्हात वाढ झाल्याने त्यास प्रतिबंध करणेकामी पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी प्रभावीपणे गस्त घालण्याची मोहीम सुरु केली आहे. दिनांक १९/०२/२०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडील पथक जावली परीसरात रात्रगस्त करीत असताना, फलटण कडुन शिंगणापुरच्या दिशेने निघालेल्या एका मोटारसायकलस्वाराची हलचाल संशयास्पद वाटल्याने, पोलीसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता, त्याने भरधाव वेगात गाडी शिंगणापुरच्या दिशेने नेहली.या प्रकारामुळे तो इसम संशयास्पद असल्याची खात्री झाल्यामुळे पोलीसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. शिंगणापुर घाटातील एका वळणावर पोलीसांनी त्यास गाठुन त्यास ताब्यात घेवुन, त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव युवराज आकोबा निकम वय ५५ वर्षे रा पिंपोड बु ता कोरेगाव जि सातारा असे असल्याचे सांगीतले. यावरुन पोलीस अभिलेख पडताळून पहाता त्याचे विरुध्द वाहन चोरीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले. यावरुन त्याचे ताब्यात मिळून आलेली होंडा शाईन मोटारसायकल (एम एच ११ सीसी ३४८५) ही सुद्धा चोरीची असल्याची शक्यता दिसुन, आल्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी केली असता, सदरची मोटारसायकल सातारा पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेल्याचे समजुन आले. सदर घटनेच्या अनुशंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं १५३/२०२५ महाराष्ट्रा पोलीस अधिनीयम १२२ अन्वये गुन्हा नोंद असुन त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मठपती करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. समीर शेख सोो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस अधीक्षक, मा. राहूल धस सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक मा. सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी.बी. बदने, पोलीस हवालदार वैभव सुर्यवंशी पोलीस हवालदार नितिन चतुरे, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तुषार आडके पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस, श्रीकांत खरात यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.
No comments