Breaking News

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेट

Agriculture Minister Manikrao Kokate visit to fruit village Dhumalwadi replica stall

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.23 - कृषि विभागा मार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नावीन्य पूर्ण बाब म्हणुन कृषी प्रदर्शन मध्ये 11 स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत  घोषित करण्यात आलेले,  फलटण जि. सातारा पासून 18 किलो मीटर अंतरावर असलेल्या  धुमाळवाडी गावात 19 प्रकारची फळझाडे सलग व 6 प्रकारची फळझाडे बांधावर अशी एकूण 26 प्रकारची फळझाडे लागवड या ठिकाणी केलेले आहेत, याची सविस्तर माहिती देणारे  फ्लेक्स द्वारे स्टॉल तयार करण्यात आले होते. तसेच स्टॉल मध्ये शेतकऱ्यानी पिकविलेल्या फळांच्या टोकरया ठेवण्यात आल्या होत्या.

    कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉल भेटी प्रसंगी, कृषि मंत्री यांनी जाणून घेतले. विविध फळंपिकाची माहिती, गावातील महेंद्र धुमाळ, सुशील फडतरे, दत्तात्रय धुमाळ, समीर पवार, त्रिंबक फडतरे यांनी दिली. यावेळी कृषि सेवारत्न सचिन जाधव यांनी या गावात कृषि विभाग रबविण्यात येत असलेले फळबाग लागवडीचे विविध उपक्रमा बाबत माहिती दिली.

    फळांचे गाव धुमाळवाडी इतर गावांसाठी आदर्श असल्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगतानाच, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या विविध फळ पिकांविषयी माहिती घेऊन कष्ट व परिश्रमाच्या जोरावर फळबाग लागवड करून, इतर गावांसाठी एक आदर्श निर्माण केला असल्याची त्यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांनचे व कृषि विभागचे कौतूक केले.

    यावेळी प्रधान सचिव कृषि मा विकास चंद्र रस्तोगी विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर उमेश पाटील,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलीद मोमीन तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड तसेच सातारा सांगली, कोल्हापूर विभागचे अधिकारी उपस्थित होते.

No comments