Breaking News

पिस्टल दाखवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न ; माजी सैनिकाकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त


An attempt to spread terror by showing a pistol; Pistol and live cartridges seized from ex-serviceman
    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - निंबळक तालुका फलटण गावच्या हद्दीत इरटीगा कारला मोटरसायकल घासली या कारणावरून झालेल्या वादामध्ये ईरटीका चालकाने, परवाना संपलेले पिस्टल काढत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दत्तात्रय बाबु महारनुर, वय 49 वर्ष, सध्या रा. वैष्णवी सिटी, ऊरळी देवाची, पुणे मुळगाव - हभिषेकवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर हे त्यांच्या इरटिगा कार (क्रमांक MH 12 US 9535) मधुन पत्नीसमवेत पंढरपूर ते पुणे असा प्रवास करीत दि. 17/02/2025 रोजी सायंकाळी 7.30 वा. चे सुमारास निंबळक, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीतील पालखी महामार्गावरुन फलटणच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्याच मार्गावरुन जाणाऱ्या एका दुचाकी वाहनाला दत्तात्रय बाबु महारनुर याची इरटीगा कार घासल्याच्या कारणावरुन त्यांचा दुचाकीस्वार विक्रम पोपट आडके यांच्याशी शाब्दीक वाद सुरु झाला. त्यामध्ये दत्तात्रय बाबु महारनुर यांनी त्याचेकडील पिस्टल बाहेर काढल्याची माहिती, तेथे जमा झालेल्या गर्दीतील लोकांकडुन फलटण ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर, पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान राखुन कोणताही अनुचित प्रकार व जिवितहानी होऊ न देता, दत्तात्रय बाबु महारनुर यांना ताब्यात घेऊन त्यांचे हातातील एक पिस्टल, एका जिवंत काडतुस व इरटिगा कार (क्रमांक MH 12 US 9535) असा 11 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    दरम्यान दत्तात्रय बाबु महारनुर यांच्याकडे जप्त पिस्टल व जिवंत काडतुसाबाबत अधिक चौकशी केली असता असे निष्पन्न झाले आहे की, ते माजी सैनिक असुन ते सैन्यदलात असताना त्यांनी मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी, कठुआ, जम्मु कश्मिर यांच्याकडून शस्त्र परवाना मिळाल्यानंतर सदचे शस्त्र खरेदी केले होते. त्यांचे शस्त्र परवान्याची नुतनीकरणाची मुदत दि. 09/06/2023 रोजी पर्यंत होती. शस्त्र परवान्याची मुदत संपल्यानंतर सदरचे शस्त्र बेकायदेशीरपणे जवळ बाळगुन कोणतेही वाजवी कारण नसताना, केवळ प्रवास करताना कारला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन, त्यांनी लोकांच्या गर्दीत ते बाहेर काढून दहशत पसरविण्यासाठी त्याचा वापर केला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करीत आहेत.

    सर्व शस्त्र परवानाधारकांना कळविण्यात येते की, शस्त्र परवाना हा फक्त बाळगण्यासाठी असतो. त्यांचा वापर फार कचित प्रसंगी, दुसरा पर्याय नसेल तेव्हाच, करावा. अन्यथा परवाना असला तरी त्यांचेवर गुन्हा नोंद होतो. आणि परवानाधारकाच्या परवान्याची मुदत संपली असेल तर ते अग्निशस्त्र बेकायदेशीरच असते. त्यामुळे हौस म्हणुन शस्त्र परवाना बाळगणे हे घातकच असते.

    पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे, पोलीस अमंलदार अमोल चांगण, सागर अभंग व अविनाश शिंदे यांनी सदर कारवाई केली आहे.

No comments