फरांदवाडी येथे ट्रान्सफॉर्मर चोरीचा प्रयत्न फसला
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१५ - दि.१३/०२/२०२४ रोजी मध्यरात्री ०२.०० वाजण्याचे सुमारास व्हीजे इंटरनॅशनल स्कूल, फरांदवाडी, फलटण येथे ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करताना, तेथे पोलीस पोहचल्याने, पोलिसांची चाहूल लागताच, ट्रान्सफॉर्मर तेथेच टाकून अज्ञात चोरटे पळून गेले. पोलिसांनी शोध घेतला असता, ते मिळून आले नाहीत. ट्रान्सफॉर्मर खाली पाडल्याने, त्याचे नुकसान झाले आहे.
No comments