फलटण उपविभागीय अधिकारी पदी विकास व्यवहारे यांची नियुक्ती
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ - फलटण येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांची प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी विकास व्यवहारे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची बदली झाल्यानंतर फलटण उपविभागीय अधिकारी पदाची जागा अनेक दिवस रिक्त होती, सदर जागी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती.
विकास व्यवहारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फलटण उपविभागाचा आढावा घेतला असून, फलटण तालुक्याला साजेसे असे काम करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विकास व्यवहारे यांनी यापूर्वी माळशिरस येथे अप्पर तहसीलदार पदी काम केले आहे. आज सकाळी विकास व्यवहारे यांनी उपविभागीय अधिकारी पदभार स्वीकारला असून त्यांच्या नियुक्तीबद्दल निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांनी अभिनंदन करीत त्यांचे स्वागत केले.
No comments