Breaking News

लालपरी जगली तरच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता सुखा -समाधानाने प्रवास करेल - प्रा.कोकरे

Only if Lalpari survives will the common people of Maharashtra travel happily - Prof. Kokere

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.23 -  छत्रपती शिवाजी महाराजांना हेच धोरण अभिप्रेत होते. रयत सुखी तरच धर्म सुखी हे जाणून शिवाजी महाराजांनी अलौकिक कार्य करून इतिहास घडवला. सुरक्षित प्रवासासाठी लालपरीचा वापर करावा असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते, ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ,फलटण आगाराच्या वतीने ३९५ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कोकरे बोलत होते. प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे , प्रवाशी बंधू भगिनी, चालक वाहक कर्मचारी,  कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

    महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून लालपरीला  ओळखले जाते. लालपरीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन गडकोट किल्यांचे दर्शन घडवले. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून प्रत्येकाला सेवेची संधी दिली. त्याप्रमाणे लालपरी एस.टि.कर्मचारी यांनी प्रवासातून सर्वांना शिवविचार देऊन क्रांती घडवली.

No comments