विवाह का निमंत्रण ॲप डाऊनलोड करू नये - फलटण पोलीस ठाणे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - सर्व नागरिकांना आणि विविध व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्यांना फलटण शहर पोलीस ठाण्यातर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, 'विवाह का निमंत्रण.apk' या नावाने ५.४ एमबी ची एक ॲप फाईल अनेक व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये तसेच वैयक्तिक वापराचे नंबर वरील व्हॉट्सॲप मध्ये येत आहे. सदर ॲप हे डाऊनलोड करू नये. या ॲपमुळे सायबर फसवणूक होऊ शकते.
कोणत्याही नावाने, कोणतीही ॲप फाईल प्राप्त झाल्यास, ती ज्यांनी पाठवली, त्यांचे कडून त्या फाईल बाबत खात्री झाल्याशिवाय ओपन करू नये तसेच डाऊनलोड करू नये. जर आक्षेपार्ह फाईल डाऊनलोड झाली असल्यास, आपल्या बँकेस तशी माहिती द्यावी आणि बँक खात्यावरील व्यवहार खात्री शिवाय करू नयेत असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.
No comments