काळजी करू नका, तपासणी सुरळीत चालू आहे - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ फेब्रुवारी - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराची आयकर विभागाकडून अद्याप तपासणी चालू असून, सध्या चौकशीचे चालू आहे. दरम्यान आज दुपारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बंगल्याच्या बाहेर येऊन, काळजी करु नका, इथे सुरळीत चालू आहे, तपासणी लवकरच संपेल असे सांगितले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्याच्या बाहेर काल दिवसभर तसेच रात्री आणि आज दिवसभर समर्थकांची गर्दी होती. दरम्यान सकाळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व दुपारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी बंगल्याच्या बाहेर येऊन लोकांना धीर दिला व ही तपासणी लवकरच संपेल असे सांगितले.
बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील तसेच फलटण येथील घरावर आयकर विभागाकडून पहाटे ६ वाजता छापा टाकून तपासणीचे कामकाज चालू करण्यात आले अद्याप तपासण्याचे काम चालू आहे. कोणतीही अधिकृत माहिती आयकर विभागाकडून प्रसिद्धी देण्यात आलेली नाही.
No comments