Breaking News

सुवर्ण पदक पटकविलेल्या श्वान सुर्या, पोलीस हवालदार निलेश दयाळ व सागर गोगावले यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार

 

Gold Medal Winners Shwan Surya, Police Constables Nilesh Dayal and Sagar Gogawle felicitated by Guardian Minister Shambhuraj Desai

     सातारा, दि. 20:    झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या 68 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीस दलातील बीडीडीएस पथकातील श्वान सुर्या याने एक्सप्लोझीव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. त्याबद्दल श्वान सुर्या व प्रथम हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ   व दुय्यम हँडलकर सागर गोगावले यांचा सत्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते करण्यात आला.

    पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्यासह पोलीस दलातील  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सुर्या श्वानाने अनेक गुन्हे उकल करण्यात मोठी मदत केली आहे. सुर्याने सुवर्ण पदक पटकवून सातारा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षकाने सुर्या श्वानाला चांगले प्रशिक्षण दिले आहे. पोलीस दलातील श्वानांसाठी राहण्यासाठी व्यवस्थेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल चांगले काम करीत आहे हे काम आणखीन चांगल्या पद्धतीने करावे. ज्या सुविधा पोलीस दलाला लागतील त्या उपलब्ध करुन दिल्या जातील,अशी ग्वाहीही देवून सुर्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले.

    68 व्या आखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुर्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टीकलमधून 55 आर्टीकल शोधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक सातारा जिल्हा पोलीस दलास प्रथम व महाराष्ट्रात पोलीस दलास 2014 नंतर प्राप्त झाले आहे, असे पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी सांगितले.

No comments