श्रीमंत संजीवराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड ; श्रीमंत रामराजे यांची प्रतिक्रिया : काळजी नसावी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ फेब्रुवारी - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली असून, सध्या चौकशी चालू आहे. सदरची रेड ही राजकीय हेतू पुढे ठेवूनच करण्यात आल्याची चर्चा सध्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्याबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांमधून होत आहे. दरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी, कृपया गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी असा संदेश आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे जनतेला दिला आहे.
आज बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील तसेच फलटण येथील घरावर आयकर विभागाने पहाटे ६ वाजता रेड टाकली. आयकर विभागाकडून आज दिवसभर तपासणी चालू असून अद्याप आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाची रेड पडल्याचे बातमी समजतात आज सकाळपासूनच फलटण तालुक्यातून कार्यकर्त्यांनी तसेच नेतेमंडळींनी श्रीमंत संजीवराजे यांच्या फलटण येथील घराच्या बाहेर गर्दी केली होती.
No comments