Breaking News

माता रमाई जयंती निमित्ताने मंगळवार पेठ येथे खीर वाटप

Kheer distribution at Mangwar Peth on the occasion of Mata Ramai Jayanti

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.८ - त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त माता रमाई मित्र मंडळ मंगळवार पेठ फलटण यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे अभिवादन कार्यक्रम घेऊन खिरवाटप करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित महिला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

    माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने माता रमाई मित्र मंडळ यांच्या वतीने पुढील वर्षापासून आदर्श माता पुरस्कार सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापु ढावरे यांनी केले. कार्यक्रमास  मंगळवार पेठ मधील महिला, तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    माता रमाई जयंती निमित्त खिरवाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोला अहिवळे, भूषण बनसोडे, जयवंत काकडे, गणपत अहिवळे, सूरज काकडे, सिद्धार्थ लोंढे, हर्षल शिंदे यांचे सहकार्य लाभले.

No comments