मुधोजी महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
फलटण-(गंधवार्ता वृतसेवा) दि.2 फेब्रुवारी - फलटण एज्युकेशन सोसायटी,फलटण संचलित मुधोजी महाविद्यालय,फलटण पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.डॉ.स्वप्निल पाटील यांनी पै. खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवन परिचय याची माहिती दिली.
मा.प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय, विद्यापीठ,राज्य विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला व महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.स्वप्निल पाटील यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार प्रा.संकेत पाटील यांनी मानले.
या वेळी मुधोजी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
No comments