Breaking News

मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळाची फलटण तालुक्यात १८ कर्ज प्रकरणे मंजूर

Maulana Azad Minority Development Corporation approves 18 loan cases in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.18 - मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ मुंबई व्यवसायासाठी उन्नती कर्ज योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यातील मंजूर करण्यात आलेली कर्ज प्रकरणाच्या मंजुरी पात्रांचे वाटप करण्यात आले.

    कर्ज मंजुरीचे पत्र सातारा जिल्हा अल्पसंख्यांक  विभागाचे व्यवस्थापक उदय कांबळे साहेब यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याच्या कार्यालयात देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक फलटण शहराध्यक्ष जमशेदभाई पठाण, सातारा जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे कारकून इकबालभाई शिकलगार व सातारा जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.

    कर्ज प्रकरणासाठी व्यवसायिकांना मार्गदर्शन करणे व कर्ज प्रकरण मंजुरीसाठीचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जमशेदभाई पठाण यांनी केला. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी या कर्ज प्रकरणाचा आर्थिक लाभ होणार आहे. कर्ज प्रकरण मंजूर झालेल्या छोट्या-मोठ्या व्यवसाय धारकांनी जमशेदभाई पठाण यांचे आभार मानले.

    फलटण शहर व तालुका 18 प्रकरणे मंजूर झाली आहे. यापूर्वी फलटण शहरातून फक्त दहा प्रकरण मंजूर झाली होती, आता प्रत्येकी तीन लाख रुपये कर्ज मंजूर झाली असल्याची माहिती जमशेदभाई पठाण यांनी दिली.



No comments