Breaking News

निरा देवधर - धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात - माणिकराव सोनवलकर

Nira Deodhar-Dhom Balkawadi Canal Connection Project work in final stage - Manikrao Sonwalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ फेब्रुवारी - दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या निरा देवधर - धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी दिली.

    यावेळी बोलताना माणिकराव सोनवलकर यांनी सांगितले की, माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणसह माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी माढा मतदारसंघातुन निवडून आलेपासून, केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता, व नुसताच पाठपुरावा केला नाही तर त्यासाठी केंद्र व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला तसेच त्यासाठी निधीही मिळविला व आज फलटण तालुक्यातील प्रत्तेक गावाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी पोहोचत असून यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अजूनही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत व ती लवकरच पूर्ण होऊन फलटण तालुक्यातील निरा देवधरचे पाणी आदर्की ते आंदरुड पर्यंत पोहोचणार आहे.

    दरम्यान आज या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी करताना दादांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली व काही सूचना दिल्या आहेत असे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर यांनी सांगितले यावेळी युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर  भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे , कार्यकारी अभियंता बोडके , इजिनियर ताकवणे , व सर्व शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments