काळजीचा विषय नाही, त्यांचा नेता 2 नंबरचा पुढारी नाही - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - समर्थक बंगल्यावर जमतात, त्यांना काळजी वाटत आहे, परंतु काळजीचे काही कारण नाही, त्यांचा नेता हा दोन नंबरचा पुढारी नाहीये. त्यामुळे लोकांनी धीर धरावा, कोणतीही अडचण येणार नाही याची दखल घ्यावी असे आवाहन श्रीमंत रघुनाथ राजे यांनी केले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाकडून तपासणी चालू असल्याचे पार्श्वभूमीवर आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी बंगल्याच्या बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला.
काळजी करण्याचे कारण नाही, काही सापडण्यासारखंच नाही, लोकांनी अश्वस्थ राहावे, यातून काही निष्पन्न होणार नाही, यांनी संपूर्ण चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो. झालं ते बरं झालं, निदान साप - साप म्हणून भुई धोपटत होते ते तरी बंद होईल. इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी चालू असून, संजीवराजे यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे, इन्कम टॅक्स पेंड आहे, तसेच इन्कम चा सोर्स देखील व्यवस्थित आहे, इथे कुठलीच गोष्ट बेकायदेशीर नाहीये असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी सांगितले.
No comments