गणेश जयंती निमित्ताने सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 1001 पेढे वाटप
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ फेब्रुवारी - आज गणेश जयंतीच्या निमित्ताने फलटण, लक्ष्मीनगर येथील जलमंदिर गणपतीस अँड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते 1001 पेढे वाटपाचा संकल्प सौ.मनीषा राजेंद्र काळे, सौ.प्रियंका विजय राजेपांढरे , व सौ.अमृता अजय राजेपांढरे यांनी केला होता. या संकल्पाची संकल्पपूर्ती बाप्पाच्या चरणी पेढे अर्पण करून कऱण्यात आली. याप्रसंगी त्यांचे समवेत सौ. गौरी सचिन पाटील, भाजपच्या महिला पदाधिकारी , स्थानिक महिला भगिनी, राजेंद्र काळे, विजय राजेपांढरे, अजय राजेपांढरे, व जलमंदिर गणपती विश्वस्त मंडळ सदस्य उपस्थित होते.
No comments