Breaking News

फलटणला निघालेल्या तरुणीवर स्वारगेट येथे बसमध्ये बलात्कार

Phaltan-bound girl raped in bus at Swargate

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.26 - बुधवारी पहाटे ५:३० वाजता पुणे स्वारगेट येथे फलटणला निघालेल्या 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकातील एका बस मध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेज माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव दत्तात्रय रामदास गाडे आहे, ज्याच्यावर आधीच दरोड्याच्या दोन घटना नोंद आहेत. स्वारगेट बस स्थानकामध्ये फलटणला जाण्यासाठी ही तरुणी आली होती, यावेळी त्या ठिकाणी अनेक बसेस उभ्या होत्या. कोणती बस फलटणला लवकर जाईल अशी चौकशी त्या तरुणीने केल्यानंतर  एका अज्ञात व्यक्तीने तिला फलटणला जाणारी बस सध्याच्या ठिकाणी थांबत नाही तर दुसरीकडे थांबते असे सांगून दिशाभूल केली. यावेळी ही तरुणी त्या बसमध्ये बसल्यानंतर तिच्या मागोमाग आरोपी बसमध्ये चढला. त्या बसमध्ये इतर कोणी व्यक्ती नसल्याचा गैर फायदा घेत आरोपीने 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. या घटनेनंतर संबंधित तरुणी फलटणला आपल्या नातेवाईकाकडे दुसऱ्या बसने आली. यावेळी त्या तरुणीने झालेला प्रकार आपल्या जवळील नातेवाईकांना सांगितला. यानंतर स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

No comments