मानवी मनाच्या उदात्त भावनांची अभिव्यक्ति म्हणजे कविता होय - रुचि भल्ला
फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ - मुधोजी महाविद्यालय फलटण येथे मानव्यविद्या शाखा, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कवि सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सम्मेलनासाठी प्रमुख अतिथि म्हणून हिंदी कवियत्री मा.रूचि भल्ला उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी कविना मार्गदर्शन करताना, त्या म्हणाल्या की, ‘कवी आपल्या भाव-भावना, आपले अनुभव हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. कवितेतून आपल्या प्रतिभा शक्तीला वाव मिळतो. मानवी मनाच्या उदात्त भावनाची ही अभिव्यक्ति म्हणजेच कविता होय.
या सम्मेलनाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच.कदम होते. त्यांनी विद्यार्थांनी स्वरचित सादर केलेल्या रचनांचे कौतुक केले. विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठीच असे उपक्रम राबविले जावेत, ही इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या माध्यमातून या युवा पीढ़ी चा सद्यस्तिथीकडे पाहण्याचा दृष्टिकोण आपणास दिसून येतो असेही त्यांनी नमूद केले. या नवोदित कविंना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मंचावर प्रो.(डॉ )अशोक शिंदे ,कला शाखा प्रमुख व प्रो.(डॉ)टी.पी. शिंदे,IQAC समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक विद्यार्थांनी आपल्या कवितेतून विविध विषयांना स्पर्श केला आहे.
या संमेलनाचे प्रास्ताविक हिंदी विभागाध्यक्ष प्रो.( डॉ )नितीन धवडे यांनी केले. अतिथि परिचय डॉ प्रा.सविता नाईक निंबाळकर यांनी केला. परीक्षक म्हणून प्रो.डॉ.प्रभाकर पवार व डॉ.अशोक शिंदे यांनी काम केले.
सूत्रसंचालन प्रा.किरण सोनवलकर यानी केले प्रा. सुप्रिया नाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या संमेलनात बहुसंख्य प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
No comments