राजे गटाच्या सुदाम मांढरे यांचा भाजपात प्रवेश; सुदामआप्पा मांढरे यांना ताकद देणार - मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ फेब्रुवारी - सामाजिक काम करणारे सुदामआप्पा यांची मुस्कटदाबी झाली होती, त्यांचे व्यक्तिमत्व कोंडून पडले होते, मात्र भाजपात प्रवेश केल्यामुळे ती मुस्कटदाबी दूर होणार असून, त्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे. भाजपकडून सुदामआप्पा यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुदामआप्पा मांढरे यांच्या प्रवेशाप्रसंगी दिले.
राजे गटाचे माजी नगरसेवक सुदामाप्पा मांढरे व त्यांच्या कुटुंबीयांनी आज माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर,रणजितसिंह भोसले, अनुप शहा, अमोल सस्ते, फिरोज आतार उदय मांढरे उपस्थित होते.
सुदामआप्पा मांढरे हे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार न करणारे व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे असे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते, लोकांच्या मनात त्यांचे वेगळे स्थान आहे, सुदामआप्पा मांढरे यांचे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान असून, शहरातील गरजू लोकांना मदत करणारे मांढरे कुटुंबीय आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, या प्रवेशाचा निश्चितपणे भाजपाला फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात फलटणची घडी बसवताना या ज्येष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला होणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
मी ज्या ज्या पक्षात होतो, तेथे प्रामाणिक काम करून विकासाचे राजकारण केले. राजे गटात गेल्यानंतर तिथेही प्रामाणिक काम केले मात्र राजे गटाने जो मला शब्द दिला होता तो पाळला नाही तरीही मी वीस वर्षे राजे गटाचे काम केले असल्याचे खंत सुदामआप्पा मांढरे यांनी प्रवेशाप्रसंगी व्यक्त केली.
No comments