बुद्ध विहाराच्या जागेसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ फेब्रुवारी - साखरवाडी, ता. फलटण येथे बुद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज आंदोलन स्थळावर विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन, आंदोलकांशी चर्चा केली व २ ते ३ महिन्यात तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले.
साखरवाडी, ता. फलटण येथे बुद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी घेऊन, साखरवाडी येथील नागरिकांनी चालत २० किलोमीटर लॉंग मार्च करत फलटण येथे येऊन जागा मिळावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले त्यानंतर साखरवाडी येथील नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.
बुद्ध विहारासाठी केलेली जागेची मागणी ही योग्य असून, मला थोडा अवधी द्या, मी दोन महिन्यात बुद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत शंकराव माडकर, पांडुरंग गुंजवटे, बापूराव गावडे, अक्षय गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments