महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणच्या खेळाडूंची निवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१५ - गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या ठिकाणी 26 वे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2024 चे आयोजन दि. 17 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे .महाराष्ट्रातील विद्यापीठ स्तरावरील या सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय ,फलटणची राज्यस्तरीय खो खो खेळाडू कु. गीतांजली राजेंद्र जाधव हिचे यशोदा अभियांत्रिकी महाविद्यालय ,सातारा या ठिकाणी पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे रायगड अंतर्गत आंतरविभागीय क्रीडा स्पर्धेतून विद्यापीठाच्या खो-खो संघात राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय ,बार्शी जि.सोलापूर या ठिकाणी पार पडलेल्या आंतर विभागीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेतून अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणचे राज्यस्तरीय खेळाडू कु. आदिती तायाप्पा राऊत व कु. माया दादा ढवळे या दोन खेळाडूंची विद्यापीठ व्हॉलीबॉल संघात सदर 26 वे महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धे साठी निवड झालेली आहे. या निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शेंडगे टी. एम. ,पदवी विभाग क्रीडा समन्वयक प्रा. व्ही.व्ही. गुंडगे यांचे मार्गदर्शन लाभले .या निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य, फ.ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री.अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. एन.जी.नार्वे, व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments