Breaking News

तलवार बाळगलेल्या इसमास फलटण येथे अटक

Sword-carrying Ismas arrested at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१५ - पंचायत समिती, फलटण  येथे गेटच्या समोर लोखंडी तलवार बाळगलेल्या इसमास फलटण शहर पोलिसांनी अटक केले आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ फेब्रुवारी २०२५  रोजी १०.४० वाजण्याच्या  सुमारास पंचायत समिती, फलटण  येथे गेटच्या समोर रस्त्यावर इसम नामे परवेज समिर पठाण, वय २३ वर्षे, रा. बादशाहि मस्जिदचे पाठीमागे, कसबा पेठ, फलटण हा लोखंडी तलवार बाळगुन असताना मिळुन आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भोसले हे करीत आहेत.

No comments