Breaking News

ट्रकमधून डोके बाहेर काढून पाहणाऱ्या ड्रायव्हरला पिकपची धडक ; ड्रायव्हर ठार

The driver who was looking out of the truck was hit by a pickup; Driver killed

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ - बारामती रस्त्यावर, नीरा उजव्या कॅनॉलच्या बारामतीपुलाजवळ बारामती कडून येणाऱ्या ट्रकचालकाने उजव्या बाजूने डोके बाहेर काढले असता, समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने त्याच्या डोक्याला धडक दिल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,   ट्रकचालक मुस्ताक जमाल खान वय 37 राहणार फिरोजपुर तालुका मेवात हरियाणा हा लेलँड कंपनीचा ट्रक नं. NL.01 AH.7903 यामध्ये बारामती येथून वेस्पा कंपनीच्या मोटारसायकल भरून तो गोवा येथे निघाला असताना, बारामती पुल फलटण येथे त्याने ट्रकच्या उजव्या साईटने बाहेर डोकावून पाहिले असता, समोरून एका  अज्ञात पिकअप सारख्या दिसणाऱ्या वाहनावरील अज्ञात चालक  (गाडी नंबर माहित नाही) याने मुस्ताक याचे तोंडाला, डोक्याला जोराची धडक दिल्याने त्यास गंभीर जखमी करून, अज्ञात पिकअप सारख्या दिसणाऱ्या वाहनावरील वरील अज्ञात चालकाने हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मुस्ताक खान यास जोरात धडक देवुन, गंभीर जखमी करून, त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे. तसेच अपघाताची खबर न देता, जखमीस औषधोपचारास न घेवुन जाता पिकअपसह पळुन गेला आहे.

    खलील इसाक खान राहणार हरियाणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात पिकअप चालका विरूध्द अपराध दाखल करण्यात आलेला आहे.

    सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे  नेमणूक फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

No comments