Breaking News

साखरवाडी येथील बौद्ध समाजाला बुद्ध विहारासाठी शासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी: ॲड. राजू भोसले

The government should immediately provide a place for the Buddha Vihara to the Buddhist community in Sakharwadi: Adv. Raju Bhosale

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.23 - साखरवाडी येथील बौद्ध समाजाला बुद्ध विहारासाठी शासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व रामोशी समाज संघटना यांच्या वतीने ॲड. राजू भोसले व ॲड. राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली  फलटण उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना देण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, ॲड राहुल मदने, साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य दयानंद मागाडे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम औचरे , मयूर सोनवणे , गोपी कांबळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी ॲड . राजू भोसले बोलत होते.

    यावेळी राजू भोसले म्हणाले, मौजे साखरवाडी - पिंपळवाडी  ता. फलटण येथील बौद्ध समाजातील ग्रामस्थ साखरवाडी ते फलटण  पायी लॉंग मार्च करून गेले 14 दिवस तहसील कार्यालय फलटण येथे ठिय्या आंदोलन करत आहेत.  उपविभागीय अधिकारी श्री . विकास व्यवहारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. ते  आंदोलकांना  सहकार्य करताना दिसतात. त्यांच्या बरोबर नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे हेही सहकार्य करत आहेत. परंतु उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय फलटण हे  सदर कामात दिरंगाई करत असल्याचे निदर्शनास येत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने  महाराष्ट्र जमीन महसूल ( शासकीय जमिनीची विल्हेवाट) नियम 1971 अन्वये जागा मागणीच्या अनुषंगाने सदर गटाची मोजणी करून मोजणी नकाशा शासनाकडे पाठवणे गरजेचे असून सदर मागणी भूमी अभिलेख कार्यालय फलटण यांनी तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी ॲड. राजू भोसले , ॲड. राहुल मदने , दयानंद मागाडे , संग्राम औचरे , मयूर सोनवणे, गोपी कांबळे यांनी निवेदन देते वेळी केली आहे.

No comments