बौद्ध विहारासाठी जागा मिळावी या मागणीला शिवसेना (उ. बा. ठा.) पक्ष फलटण तालुकावतीने जाहीर पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ - साखरवाडी तालुका फलटण या गावातील बौद्ध बांधव यांच्यावतीने साखरवाडी गाव ते फलटण प्रांत ऑफिस सोमवार दिनांक 10/02/2025 पायी चालत लॉंग मार्च काढण्यात आला लॉंग मार्च काढण्यामागचा उद्देश एवढाच की, या बांधवांना साखरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी मागणी करूनही जागा उपलब्ध करून दिली जात नाही. खरंतर या बौद्ध बांधवांची मागणी योग्य व संविधानिक आहे, तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन व इतर प्रशासन यांच्याकडून कायम या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि म्हणून नाईलाजास्तव आज हे बौद्ध बांधव प्रांत ऑफिस फलटण च्या बाहेर उपोषणासाठी बसलेले आहेत. बौद्ध विहार बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून, या बांधवांना उपोषणाला बसावं लागला आहे ही दुर्दैवी बाब असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष फलटण तालुका यांच्या वतीने बौद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून या आंदोलनास जाहीर पाठिंबा आहे. तसेच पुढील काळात हे बौद्ध विहार बांधण्यासाठी काही मदत पक्षाच्या वतीने करता येईल. यासंदर्भात जाहीर समर्थन पत्र आंदोलनकर्त्याना शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विकास नाळे, तालुका संघटक श्री.नंदकुमार काकडे, शहर संघटक श्री.अक्षय विलास तावरे,शिवआरोग्य सेनेचे श्री. अंकुश पवार व श्री.प्रविण पवार यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.
No comments