फलटण येथे अपार्टमेंट पार्किंग मधून मोटरसायकलची चोरी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - ब्राह्मण गल्ली, फलटण येथील अपार्टमेंट मध्ये पार्क केलेली मोटरसायकल भरदिवसा हँडल लॉक तोडून आज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
दिनांक 14/02/2025 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.00 वाजण्याच्या दरम्यान रॉयल रेसीडेन्सीचे पार्कींगमधून ब्राम्हण गल्ली, फलटण येथुन हँण्डल लाँक करून पार्क केलेली होंन्डा कंपनीची मोटारसायकल क्र.एम एच ११ सी आर ०९८४२ अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याची फिर्याद सरस्वती मधुकर काशीद रा. रॉयल रेसीडेन्सी, दुसरा मजला, फ्लँट नं. 5, ब्राम्हण गल्ली, फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सचिन फाळके करीत आहेत.
No comments